अहमदनगर मध्ये एका दिवसांत फुटले ८० कोटींचे फटाके ! आरोग्यासह पर्यावरणाला धोका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर मध्ये दिवाळीनिमित्त कोट्यवधी रूपयांचे फटाके उडवण्यात येत आहेत. त्यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पनेला ‘फटाके’ लागले असून, कर्णकर्कश आवाज व धुरामुळे आरोग्यासह पर्यावरणाला धोका निर्माण झाला.

लक्ष्मी पूजनच्या रात्री आतषबाजीमुळे प्रदूषणाची पातळी सर्वाधिक उंचावली. धुलीकणांमुळे कित्येकांना श्वसनास त्रास होईल अशी स्थिती निर्माण झाली होती.

दिवाळीत खरेदी झालेल्या तब्बल ८० कोटींच्या फटाक्यांतून निघालेल्या धूरातून यंदा हवेतील वायू प्रदूषणात कोही अंशाने वाढ झाली असून, वाढलेले प्रदूषण हे मध्यम स्वरूपाचे आहे.

नगर शहरात रविवारी रात्री ९ ते ११ या तीन तासांच्या कालावधीत १७७ मायक्रो ग्रॅम वायू प्रदूषणाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या दिवशी १३० मायक्रो ग्रॅम हवेतील गुणवत्ता होती. रविवारी यात ४७ मायक्रो ग्रॅमने वाढ झाली. नियमित हवेत ९० मायक्रो ग्रॅमची गुणवत्ता असते.

नगर शहरातील न्यू आर्ट महाविद्यालयाच्या आवारात शहरातील तीन किलोमीटर परिसरात असलेल्या हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आणि अॅनालायझर यंत्र बसवण्यात आले आहे.

या यंत्रात गेल्या २४ तासांतील हवेची गुणवत्ता तपासणी जाते. रविवारी रात्री ९ ते ११ या कालावधीत फटाक्यांच्या धुरामुळे १७७ मायक्रो ग्रॅम हवेची गुणवत्ता या यंत्रात मोजली गेली. १०९ ते जास्ती- जास्त २०० मायक्रो ग्रॅम हवेची गुणवत्ता ही सर्वसाधारण असते.

शहरात दैनंदिन ८० मायक्रो ग्रॅम वायू प्रदूषण होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४७ मायक्रोग्राम वायू प्रदूषण अधिक झाले. हे मानवी शरीरासाठी धोकादायक नाही. गेल्या वर्षी १३० मायक्रो ग्रॅम वायू प्रदूषणाची नोंद झाली होती.

हवेतील प्रदूषण मध्यम स्वरूपाचे

दिवाळीच्या दिवशी जे प्रदूषणमोजले गेले ते मध्यम स्वरूपाचे होते, तेमानवी जीवासाठी धोकादायक नाही. शिवाय धुळीच्या कणांचे देखील प्रदूषणकमी प्रमाणात होते. सचिन वाघ, अभियंता ऑनलाईझर यंत्र,