आधी जीवे मारण्याची धमकी मग अपहरण अन बळजबरीने अत्याचार… : नगर तालुक्यातील घटना

Pragati
Published:

Ahmednagar News : तो कार घेऊन आला अन पती पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने पत्नीला कारमधून पळवून नेले.आणि त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एका जणाविरूध्द अपहरण, अत्याचार आदी कलमानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विकी पोपट भोसले (रा. कासारवाडी, तिसगाव, ता. पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादी महिला नगर तालुक्यातील एका गावात पतीसोबत राहते. २१ जून २०२४ रोजी सायंकाळी विकी भोसले हा त्याच्याकडील कार (एमएच १२ सीव्ही ९४०९) मधून फिर्यादी पीडित महिलेच्या घरी आला.

फिर्यादी पीडित महिलेची त्याच्या सोबत ओळख होती. त्याने फिर्यादी महिलेसह तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली व फिर्यादीला बळजबरीने कारमध्ये बसविले. तो फिर्यादी महिलेला कारमधून घेऊन गेला व तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले.

सदरचा प्रकार २१ जून ते २४ जून २०२४ दरम्यान घडला असून या प्रकरणी पीडिताने १९ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोंढे करत आहेत.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस घरफोडी, अत्याचार, खून आदी घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तरी पोलिसांनी अशा घटनांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe