Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ दरोडा प्रकरणातील पाच आरोपींना अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Crime : शेवगाव तालुक्यातील चापडगाव व आखेगाव येथील दरोडा प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. दीपक गौतम पवार, गोविंद गौतम पवार व राजेश दिलीप भोसले (तिघे रा. टाकळी अंबड, ता. पैठण),

नितीन मिसऱ्या चव्हाण (रा. जोडमालेगाव, ता. गेवराई) व किशोर दस्तगीर पवार (रा. हिरडपुरी, ता.पैठण) असे अटक करण्यात आलेल्या ५ आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून २ लाख ४९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

चापडगाव शिवारातील कमलेश सुभाष वाल्हेकर यांच्या कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी दरोडा टाकला होता. सोन्या-चांदीचे दागिने, मोटारसायकल, टिव्ही, गॅस शेगडी, ६ शेळ्या असा एकूण १ लाख ८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता.

तसेच आखेगाव येथील फिर्यादी अभय राधकिसन पायघन यांची आई तसेच रामकिसन पांडू काटे यांना मारहाण करत त्यांच्याकडील ५० हजाराची रोकड लुटून नेण्यात आली होती. चापडगावची घटना २१ तर आखेगावची घटना २४ डिसेंबर रोजी घडली होती.

या दोन्ही प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९४, ४५२, ४५७, ३८०, ५०६, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिस पथकाने टाकळी अंबड येथे सापळा रचून आरोपींना अटक केली. सदरील ५ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

त्यांनी आणखी ५ साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले. सोन्या मजल्या भोसले, उद्या मजल्या भोसले संभाजी गौतम पवार, अभिषेक भैय्या चव्हाण व आणखी एका साथीदारांचा या घटनेत समावेश असून, ते पसार आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला. अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर, पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ. मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संतोष लोंढे, पोना. रविंद्र कर्डिले,

संदीप चव्हाण, संदीप दरंदले, फुरकान शेख, संतोष खैरे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, शिवाजी ढाकणे, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, राहुल येमूल, आकाश काळे, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, उमाकांत गायकवाड, अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.