अहमदनगर बातम्या

काँग्रेस शिष्टमंडळाच्या मागणीवरून प्रलंबित योजनांचे पाच कोटी 96 लाख 65 हजार रुपये बँकेत वर्ग ! 18274 पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Sangamner News : काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून विविध गावांमधील वाडीवस्त्यावरील योग्य व पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे .मात्र अनेक दिवसांपासून हे अनुदान रखडवले गेले होते. याबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी 23 डिसेंबर रोजी प्रशासनाकडे तातडीने प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याची विनंती केल्यानंतर आज शासनाने 18 हजार 274 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पाच कोटी 96 लाख 65 हजार रुपये जमा केले आहे.

संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असूनही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावात वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या आहेत. तसेच योग्य लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध काळ योजना यामधील अनेक लाभार्थ्यांचे अनुदान राजकीय हेतू ठेवून जाणीवपूर्वक रखडले गेले होते.

याबाबत लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला यानंतर प्रशासनाने अनुदान देण्याचे मान्य केले. परंतु दिवाळीनंतर हे अनुदान मुद्दाम रखडून ठेवल्याने काँग्रेस शिष्टमंडळाने सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली 23 डिसेंबर 2024 रोजी प्रांताधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन सर्व प्रकरणे तातडीने मार्गी लावावी तसेच लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान द्यावे अशी आग्रही मागणी केली याचबरोबर हे अनुदान तातडीने जमा न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता

या मागणीची प्रशासनाने दखल घेऊन  संजय गांधी निराधार योजनेचे 6280 लाभार्थ्यांना 2 कोटी 61 ला 74 हजार रुपये , श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 5676 लाभार्थ्यांना 1 कोटी 65 लाख 72 हजार रुपये, तर श्रावण बाळ गट निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 4439 लाभार्थ्यांना 1 कोटी 13 लाख 5 हजार रुपये, याचबरोबर अनुसूचित जाती जमाती मधील 1879 लाभार्थ्यांना 20 लाख 13 हजार रुपये असे एकूण 5 कोटी 96 लाख रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होणार आहे.

यामुळे संजय गांधी निराधार योजनेसह सर्व योजनांमधील पात्र लाभार्थ्यांनी हे अनुदान मिळणे कामी काँग्रेस शिष्टमंडळांनी केलेल्या पाठपुराव्याचे अभिनंदन केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24