वारंवार समन्सची तसेच अजामीनपात्र वाँरंटची बजावणी करून देखील न्यायालवासमोर हजर न राहणाऱ्या पाच जणांना भिंगार कॅम्प पोलिसांनी जेरबंद केले आहे. शनिवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.
अक्षय संजय भिंगारदिवे, रामा अंकुश इंगळे (दोघे रा. निंबोडी ता.नगर), पवन राजेंद्र नायकू (रा.नेहरू चौक, भिंगार), स्वप्निल सुधाकर शेलार (रा.शिवाजी चौक, भ्रिंगार), महेश सुरेश गायकवाड (रा. सरपन गल्ली, भिंगार) अशी अटक केलेल्या पाचजणांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, भ्रिंगार कॅम्प पोलिसांना हद्दीतील आरोपींना अजामीनपात्र बाँरट बजावणी कामी दिले होते. मात्र वारंवार वॉरंटची बजावणीकरून देखील संबंधित न्यायालयासमोर हजर राहत नव्हते.
शनिवारी रात्री गस्तीबरील पोलिसांच्या पथकाने वरील पाच आरोपींना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिनकर पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार जालिंदर आव्हाड, बिभोषन दिवटे, रघुनाथ कुलांगे, राहुल व्दारके, सागर तावरे, अमोल आव्हाड, संदीप शिंदे, अरूण मोरे, भागचंद लगड, इरफान पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.