अहमदनगर बातम्या

कार – टेम्पोच्या धडकेत पाच जण गंभीर जखमी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :-  पारनेर तालुक्यातील देवीभोयरे फाटा ते निघोज दरम्यान पुढे चाललेल्या टेम्पोला मागून आलेल्या एका कारने धडक दिली असल्याची घटना घडली आहे.

या अपघातात कार मधील पाच जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. यामध्ये अंकुश लेंधे, लहानु लेंधे, चालक गणेश लेंधे, जयराम गोंधे, ऋषिकेश शिंदे हे पाचजण होते.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कार मधील सर्वजण संगमनेर तालुक्यातील नांदूरखंदमाळ येथील असून हे सर्वजण निघोज येथे शिंदे यांच्या कडे एका घरगुती कार्यक्रमास जात होते.

मात्र निघोजच्या अलीकडेच शिरसुले फाटा इथे उतारावर कारने वेग पकडला आणि पुढे असलेल्या टेम्पोवर कार धडकली. हा अपघात एवढा मोठा होता की कार टेम्पोत मागून आत अडकली.

यावेळी मोठा आवाज झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना बाहेर काढले. जखमींना निघोज प्राथमिक आरोग्य केंद्रात व पुढे शिरूर इथे नेण्यात आले.

Ahmednagarlive24 Office