पेट्रोल पंपावर सोशल डिस्टन्सिगचा फज्जा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पाथर्डी :- तालुक्यातील आदिनाथनगर येथील वृद्धेश्वर कारखाना परीसरातील पेट्रोल पंपवर दररोज सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, निवंडुगे, ढवळेवाडी, कोपरे, वाघोली, चितळी, साकेगाव तसेच शेवगाव, तालुक्यातून पेट्रोल व डिझेल घेण्यासाठी लोक दररोज येतात.

कोरोना रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पेट्रोल व डिझेल ठरलेल्या वेळेप्रमाणे चालू आहे. तसेच वेळेत बंदही होत आहे.

पेट्रोल भरण्यासाठी सकाळी नऊ वाजेपर्यंत गर्दी होत आहे.परंतु पंपवर पेट्रोल भरण्यासाठी येणारे ग्राहक सुरक्षित अंतर ठेवत नाहीत. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नाहीत.

याकडे पंप चालक व कर्मचारी यांचे दुर्लक्ष दिसून येते. काही व्यक्ती डिझेल याठिकाणी ड्रममध्ये विकत घेऊन बाहेर दुसऱ्या गावी दिवसभर विकताना दिसत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24