अहमदनगर बातम्या

अहिल्यानगर महानगरपालिकेत आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहिल्यानगर – ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अहिल्यानगर महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी नगरकरांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी महानगरपालिका कटीबद्ध राहील, प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छ व सुंदर अहिल्यानगरसाठी महानगरपालिका प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन त्यांनी केले.

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपायुक्त संतोष टेंगळे, विजयकुमार मुंडे, प्रियांका शिंदे – काळे, मुख्य लेखा परीक्षक विशाल पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन धस, सहाय्यक आयुक्त सपना वसावा, नगरसचिव मेहेर लहारे, शहर अभियंता मनोज पारखे,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सतीश राजुरकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, शहरातील नागरिकांना सर्व सेवा व सुविधा पुरवण्यासाठी महानगरपालिका कटीबद्ध आहे. शहरात स्वच्छतेसाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे. नागरिक व सामाजिक संघटनांना सहभागी करून घेत स्वच्छ शहरासाठी उपाययोजना करत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नगरकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24