Ahmednagar News : अनेक वर्षाचा तपोवन रोडच्या डांबरीकरण कामाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे या परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे, आज मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती वाढल्या आहे, शहराच्या विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून मोठा निधी प्राप्त होणार आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची कामे सुरु आहेत. सावेडी उपनगर भागातील विकासाच्या कामांना गती दिली असून आहे. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्न ातून विविध विकासकामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे,
नगरसेवक सुनील त्रिंबके, नगरसेविका मिना चव्हाण, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, अशोक ढवण, किसन कसबे, योगेश ठुबे, सतीश ढवण, स्वप्नील ढवण, प्रशांत निमसे, प्रशांत धाडगे, धीरज उकिर्डे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर म्हणाले की, प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरु आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे, नियोजनबद्ध कायमस्वरूपाची दर्जेदार विकासकामे करीत असल्यामुळे ही कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येणार नाही असे ते म्हणाले.