… त्याच पावलावर पाऊल ठेवून अविनाश आदिक यांची वाटचाल सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- स्व. गोविंदराव आदिकांनी नेहमीच गोरगरीब जनतेचे कल्याण पाहिले, त्याच पावलावर पाऊल ठेवून अविनाश आदिक यांची वाटचाल सुरू आहे.

अविनाश आदिक हे पक्षाच्या माध्यमातून सरकार दरबारी पाठपुरावा करून अनेक कामे मार्गी लावत आहेत, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या वाढदिवसानिमित्त उम्मती वेल्फेअर सोसायटीतर्फे समाजातील गरजू घटकांना ब्लँकेट व किराणा किटचे वाटप करण्यात आले.

त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेवक मुक्तारभाई शाह, डॉ. वसंतराव जमदाडे, अर्चना पानसरे, सोहेल बारूदवाला, सलीमखान पठाण, लकी सेठी, एस. के. खान, अमजद पठाण, रोहित शिंदे, डॉ. भरत गिडवानी आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24