अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :-अंगावर पाणी उडवू नका सांगितल्याचा रागातून चौघा जणांनी चक्क एका डॉकटरला बेदम मारहाण केली आहे.
दरम्यान हा धक्कादायक प्रकार नगर शहरातील गावंडे मळा येथील साफल्य निवास येथे घडला आहे. याबाबत डॉ. अक्षयकुमार अनिल साठे (वय ३०) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरून गावंडे(पूर्ण नाव माहिती नाही), सुवर्णा गावडे, विवेक गावडे व गावडे याच्यासह अनोळखी व्यक्ती (सर्व रा. गावडे मळा) यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवारी सकाळी डॉ. अक्षयकुमार साठे हे घराच्या कंपाउंड मध्ये बसले होते. गावडे नावाचा व्यक्ती हा त्याच्या घरावरील भिंतीला पाणी मारत असताना हे पाणी अक्षयकुमार यांच्या अंगावर पडले.म्हणून त्यांनी गावडे याला दुसरीकडे पाणी मारा असे सांगितले.
याचाच मनात राग धरून गावडे व इतर तिघांनी डॉक्टर यांच्या कंपाउंडमध्ये शिरून लोखंडी गज व लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले आहे असे फिर्यादीत सांगितले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक जाधव हे करीत आहेत.