अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-पारनेर तालुका दूध संघाची लढाई आम्ही आता जिंकली आहे. आता दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुका दूध संघ तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा सुरू करीत आहोत.
आम्ही एक लढाई जिंकली, आता पुढची लढाई तालुक्याची कामधेनू असलेला पारनेर तालुका सहकारी कारखाना पुन्हा शेतकऱ्यांना परत मिळविण्यासाठीची असेल, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
तालुका दूध संघाच्या दूधसंकलनाचा प्रारंभ संघाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन व दूधउत्पादकांचा मेळावा नुकताच सुपे येथे झाला. त्या वेळी आमदार लंके बोलत होते.