प्रथमच जिल्ह्यातील मृत्यूची संख्या झाली कमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वीस हजारांच्या पुढे गेला. २४ तासांत ६३२ पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे बाधितांची एकूण संख्या २० हजार ५८५ झाली.

आणखी तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून बळींची संख्या २८१ झाली आहे. दरम्यान, महिन्याभरात प्रथमच सर्वात कमी बळीची संख्या शनिवारी नोंदवण्यात आली.

जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत २३५, अँटीजेन चाचणीत १२३ आणि खासगी प्रयोगशाळेत २७४ बाधित आढळले. कोविड चाचणी प्रयोगशाळेत मनपा हद्दीतील ९५, संगमनेर ४९, पाथर्डी १०, नगर ग्रामीण २१, श्रीगोंदे १,

पारनेर ११, राहुरी ७, शेवगाव २७, जामखेड १ आणि मिलिटरी हॉस्पिटल १३ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत संगमनेर ४, राहाता १३, नगर ग्रामीण २५,

श्रीरामपूर ७, कॅन्टोन्मेंट ७, श्रीगोंदे ११, अकोले २, कोपरगाव २३, जामखेड ४ आणि कर्जत २७ रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी ५४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24