सलग दुसऱ्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाबत झाले असे काही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद नाही. मात्र, नव्याने २०५ पॉझिटिव्ह आढळून आले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१४ टक्के आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १३६८ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२ आणि अँटीजेन चाचणीत १३६ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील २२, जामखेड १, नगर ग्रामीण ३, नेवासे १, पारनेर २, पाथर्डी ९, राहुरी १, शेवगाव १, श्रीगोंदे ३, श्रीरामपूर १, मिलिटरी हॉस्पिटल २ आणि इतर जिल्ह्यातील १ रुग्णाचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत मनपा ५, अकोले १, कर्जत १, नगर ग्रामीण ६, पाथर्डी २, राहाता ४, संगमनेर १, श्रीगोंदे १, श्रीरामपूर १ रुग्णाचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत मनपा ९, अकोले २३, जामखेड ३१, कर्जत ६, कोपरगाव १, नगर ग्रामीण ४, नेवासे ५, पारनेर ४, पाथर्डी २२, राहाता ५, राहुरी ३, संगमनेर ९, शेवगाव १२, श्रीगोंदे १ श्रीरामपूर १ रुग्णाचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24