अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकतेच एका व्यापाऱ्याचा खून करण्याचा धक्कादायक प्रकार राहाता तालुक्यामध्ये घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
येथील राजेंद्र लालजीभाय भंडारी यांना दि.30 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नगर-मनमाड रोडवरील हॉटेल गुरुकृपा समोरून दुपारी दीड वाजेच्या सुमारास विशाल कोते,
मनोज वाघ, सुयोग गायके सर्व रा. शिर्डी, रवींद्र बैरागी रा. नांदुर्खी, ता. राहाता यांनी बळजबरीने रिक्षामध्ये बसवून भंडारी यांच्यावर धारदार कोयत्याने मानेवर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
त्याचवेळी आरोपींनी भंडारींच्या खिशामधील असलेले 27 हजार रुपये व एमआय कंपनीचा मोबाईल फोन काढून घेतला व एटीएम कार्ड घेऊन त्याचा पासवर्ड बळजबरीने घेऊन त्यातील पैसे काढून घेतले.
तसेच फिर्यादीच्या घरामध्ये घुसून फिर्यादीस तसेच त्यांचे पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
भंडारी यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांत वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना शिर्डी पोलिसांनी अटक केली असून दोघांचा शोध घेतला जात आहे.