तब्बल दहा लाखांची विदेशी दारू जप्त!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-राज्य उत्पादन शुल्क, नगर व बीड यांनी संयुक्त मोहिम राबवून पाथर्डी तालुक्यातील वडगाव शिवारात सुमारे पाच लाख रूपये किंमतीचा देशी- विदेशी दारूचा साठा व एक पिकअप वाहन असा १० लाख १७ हजार ७८४ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी सचिन विठ्ठल शेळके (वय ३६ रा. वडगाव ता. पाथर्डी), बाळासाहेब रामराव जायभाये (रा. पिंपळनेर ता. शिरूर कासार जि. बीड) यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन शेळके याला अटक केली आहे. वडगाव शिवारात विदेशी मद्याचा साठा असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक ए. बी. बनकर यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क नगर पथक क्रमांक 1 व बीड विभाग यांच्या पथकाने रविवारी सचिन शेळके याच्या घरी छापा टाकला.

मँकडॉल व्हिस्की, बनावट देशी दारू असा सुमारे पाच लाखाची दारू व दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे पिकअप वाहन (क्र. एमएच १६ एवाय ४९१०) पोलिसांनी जप्त केले आहे.

राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए. बी. बनकर, घोरतळे, दिंडकर, दुय्यम निरीक्षक अजित बडदे, महिपाल धोका, विजय सुर्यवंशी,

दत्तात्रय ठोकळ, वैभव बारवकर, कर्मचारी दिंगबर ठुबे, उत्तम काळे, अंकुश कांबळे, सचिन वामने, सचिन बटोळे, सांगुळे, रत्नमाला काळापहाड, शुभांगी आठरे, संपत बिटके, शेळके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अहमदनगर लाईव्ह 24