अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-नगर तालुक्यात युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाच्यावतीने मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा बिगुल वाजला असताना त्याचवेळी तालुक्यात युवक काँग्रेसने संघटनात्मक बांधणीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.
युवक जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले यांनी लवकरात लवकर तालुका कार्यकारिणी गठित करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिल्या आहेत.
नगर तालुका युवक काँग्रेस आणि एनएसयुआयची संघटनात्मक आढावा बैठक उगले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. काँग्रेसचे नगर शहर जिल्हाध्यक्ष तथा एनएसयुआय,
युवकचे जिल्हा समन्वयक किरण काळे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी युवक काँग्रेसने तालुकाध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, एनएसयूआयचे सुजित जगताप, शहर क्रीडा काँग्रेसचे प्रवीणभैय्या गीते,
प्रमोद अबुज, अमित भांड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उगले म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून काँग्रेसचे मोठे वजन आहे.
ना. बाळासाहेब थोरात, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीतदादा तांबे यांच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी युवक काँग्रेस काम करेल.
शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, नगर तालुक्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्के, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस संघटनेची बांधणी उत्तम प्रकारे सुरू आहे.
युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, दक्षिण कार्याध्यक्ष राहुल उगले, उत्तर कार्याध्यक्ष सुभाष सांगळे अशी नव्या दमाची टीम युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काम करत आहे युवक तालुकाध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, सुजित जगताप आदींची यावेळी भाषणे झाली.
जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उगले यांचा हा पहिलाच दौरा असल्यामुळे निवडीबद्दल किरण काळे यांच्या हस्ते उगले यांचा बैठकीत सत्कार करण्यात आला. यावेळी नगर तालुक्यातील विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.