अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : शहरामध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात दररोज होत असतानाही महापालिका प्रशासन सुस्त आहे.
याचा तीव्र निषेध करत माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी स्वखर्चाने मुरुमाच्या गाड्या आणून दिल्लीगेट परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविले आहेत.
शहरामध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहतूकीला मोठी अडचण होते. रोज छोटे मोठे अपघात होत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नालेगाव गोगादेव मंदिरासमोरील रस्त्यावरील खड्डयामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महापालिकेने खड्डे बुजविणारी कोणतेही उपाय योजना आतापर्यंत केलेली नाही.
वारंवार महापालिकेकडे पत्रव्यवहार करूनही सुस्त प्रशासनाला कोणताही फरक पडलेला नाही. त्यांना अजुन किती बळी हवे आहेत, असा सवाल माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी केला.
सोमवारी (दि.२७) रात्री महापालिकेचा निषेध करत म्हणुन स्वत: खर्चाने मुरूमाच्या गाड्या आणुन दिल्लीगेट परिसरातील खड्डे बुजविण्याचा उपक्रम राबविला