अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावू लागला आहे.
निवडणुकीत विजयाचा झेंडा आपल्या पक्षाच्या हाती असावा यासाठी नेतेमंडळींसह कार्यकर्ते देखील धावपळ करू लागले आहे.
दरम्यान यातच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
नेमके प्रकरण असे कि, कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसापूर्वीच जे कोणी ग्रामपंचायत बिनविरोध करणार त्यांच्या गावाच्या विकासासाठी आपण ३० लाख रुपया देणार असं त्यांनी जाहीर केले होते.
मात्र आता त्याच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करा अशी मागणी कर्जत – जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांनी केली आहे. या प्रकरणावरून राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.
राम शिंदे म्हणाले कि ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तीस लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. हे बक्षीस म्हणजे लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे,
यामुळे राज्य निवडणूक आयोगाने रोहित पवारांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे.