अहमदनगर बातम्या

आगामी निवडणुका संदर्भात माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे यांनी केली महत्वाची घोषणा !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील सर्व निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लढविण्याचा निर्धार व्यक्त करून, आतापासूनच बुथ कमिटीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करावी.

यासाठी शहरात सुकाणू समिती नेमण्याची घोषणा माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. भारतीय जनता पक्षाच्यावतीने श्रीरामपूर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात आ. विखे पाटील यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधत आगामी निवडणुकांबाबतचे भाकितही यावेळी केले.

कोविडचे संकट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील जनतेचे प्रश्न गंभिर बनले आहेत. तीन पक्षांच्या सरकारला जनतेचे प्रश्न सोडविण्यात कोणतेही स्वारस्य राहीले नाही.

जनतेचा उद्रेक रस्त्यावर येऊ नये म्हणून सरकार फक्त जनतेवर दबाव आणत आहे. प्रश्न सोडविण्याला महत्त्व देण्यापेक्षा जमावबंदी आदेश लागू करण्यातच सरकारचे महत्त्व अधिक दिसत असल्याचा टोला भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

यापुढील सर्व निवडणुका या भाजपाच्या झेंड्याखालीच लढविल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात या सरकारने राज्यातील जनतेला कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप करून,

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत करण्याऐवजी वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा सरकारने पाठविण्यात धन्यता मानली. एसटी कामगार आज आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानात बसून आहे.

सरकारच्या नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या फक्त बैठका सुरू आहेत. कामगारांना न्याय देण्याची इच्छाशक्ती महाविकास आघाडी सरकारमध्ये नसल्याची टीका त्यांनी केली..

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office