अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यातच कोरोनाचा अनेकांना प्रादुर्भाव झाला होता.
या विषाणूचे संक्रमण अनेक नेते, सर्वसामान्य, यांच्यासह राजकीय पुढारी मंडळी यांना झाले होते. यातच माजीमंत्री बबनराव पाचपुते यांना कोरोनाचे संक्रमण झाले होते.
मात्र पाचपुते यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. प्रदीर्घ काळ उपचार घेतल्यानंतर ते काष्टी येथील निवासस्थानी परतले आहेत. यानंतर त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट लिहून लोकांच्या सेवेसाठी सज्ज असल्याचे जाहीर केले आहे.
काही काळ क्वारंटाईनमध्ये आणि काही काळ अतिदक्षता विभागात माझ्यावर उपचार करण्यात आले. डॉक्टरांचे मनापासूनचे प्रयत्न मला या संकटातून वाचवण्यात यश देऊन गेले.
माझ्यासह पत्नी डॉ. प्रतिभा ह्याही कोरोनावर उपचार घेत होत्या. अख्या घरात आम्ही दोघेच पॉझिटिव्ह आढळून आल्याने आम्हा दोघांनाच क्वारंटाईन व्हावे लागले.
यावेळी पाचपुते म्हणाले कि, कोरोनाच्या संकटावर मात केल्यानंतर नव्या दमाने पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी सज्ज होत आहे.
कोरोना काळात माझ्यावर उपचार करणारे सर्व डॉक्टर्स, वैद्यकीय सेवक आणि सदिच्छा व्यक्त करणाऱ्या आपणा सर्वांचे आभार मानण्याऐवजी ऋणात राहून धन्यवाद व्यक्त करतो.