माजीमंत्री कर्डीले म्हणाले….राज्य सरकारला शेतकर्‍यांचे काही देणे-घेणे नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-राज्यात सध्या वीजबिलाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपत आहे. वीजबिल माफीसाठी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर दबाव आणला जात आहे.

मात्र वीजबिले माफ होणार नाही अशी ठाम भूमिका सरकारने घेतली आहे. यातच माजीमंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी या प्रश्नावरून सरकारवर टीका केली आहे.

यावेळी बोलताना कर्डीले म्हणाले कि, वीजपुरवठा व रोहित्र बंद करण्याचे आदेश उर्जामंत्र्यांनीच दिले. पुन्हा थकबाकी भरून घेऊन रोहित्र सुरू करण्याची नौटंकी केली.

शेतकर्‍यांच्या भावनेशी खेळी करताना त्यांच्याच समर्थकांनी रोहित्र सुरू केल्याचे श्रेय मंत्र्यांना देऊन त्यांची पाठ थोपटली. अवकाळीमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हाती आलेली पिके गेल्याने संकट कोसळले आहे.

शासनाने अद्यापही पंचनामे करण्याचे आदेश दिलेले नाहीत. राज्य सरकारला शेतकर्‍यांचे काही देणे-घेणे नाही. गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप झाले तरी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात सरकार वेळ खर्च करीत आहे.

राहुरी तालुक्यात विजेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वीजबिल वसुलीकरिता वीज रोहित्र बंद करण्याचे काम सुरू आहे. अशी टीका माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली.

वास्तविक पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा वीजपुरवठा खंडीत करताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या परवानगीशिवाय बंद केला जात नाही.

मात्र, उर्जामंत्र्यांच्याच तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी योजनेचाच वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचा आरोप कर्डिले यांनी केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24