अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर कोरोना महामारीच्या चिंताजनक परिस्थितीत जनतेला धीर दिला.
कोरोना रोखण्यासाठी लाॅकडाऊनच्या नियमांचे पालन करून उपाययोजनेत देश आत्मनिर्भर करण्याचा एक सोनेरी अध्याय जोडून जागतिक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली, असे गौरवोद्गार माजी मंत्री मधुकर पिचड यांनी काढले.
मोदी सरकारच्या दुसऱ्या पंचवार्षिकला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बुथनिहाय पंतप्रधानांचे पत्र वाटपाचा शुभारंभ अकोले येथे मधुकर पिचड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, गिरजाजी जाधव, यशवंत आभाळे, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र डावरे, राहुल देशमुख उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने देशाला आत्मनिर्भर बनवण्याचे काम चालवले. आत्मनिर्भर भारत अभियानासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेजची तरतूद करून एक मोठे पाऊल टाकले. या अभियानातून प्रत्येक नागरिक उभा राहील, असाही आत्मविश्वास पिचड यांनी व्यक्त केला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews