अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे वडील शंकरराव बापू शिंदे यांचे शनिवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर काल (रविवार) अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यानंतर मात्र माजीमंत्री प्रा. राम शिंदे भावनिक झाले. त्यांनी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर टाकली. त्यांनी म्हटले आहे की,
“मोठी होती तुमची छाया, निर्मळ होती तुमची माया सदैव ह्यदयात राहील, तुमची पवित्र काया भाऊ तुम्हीच होता, माझ्या कर्तुत्वाचा पाया”
शंकरराव शिंदे यांच्या निधनाने संपूर्ण शिंदे परिवार तसेच तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. जीवनाला आकार देण्यासाठी आयुष्यभर मोठे कष्ट सोसलेले
त्यांचे वडील शंकरराव यांच्या आठवणीने तालुकाही हळहळला. यासंदर्भात प्रा. शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews