अहमदनगर बातम्या

‘त्या’ कार्यकर्त्याला भेटायला माजी मंत्री पंकजा मुंडे येणार..!

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षाने विधानपरीषदेच्या निवडणुकीत डावलल्याने त्यांचे समर्थक मुकुंद गर्जे यांनी विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर गर्जे यांना भेटण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे येणार आहेत.

शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधुन त्या मोहटादेवीचे दर्शन घेणार आहेत. मुंडे यांची राजकीय भुमिका काय याबाबत पाथर्डीकरामध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
पंकजा मुंडे यांची भाजपात घुसमट होत असल्याची भावना कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत.

पाथर्डीत येवुन मुंडे नेमके काय बोलणार आणि मुंडे यांच्या बोलण्याचा त्यांचे कार्यकर्ते काय अर्थ काढणार हे दि.२१ जुनला समजेल. मुंडे पाथर्डीत त्यांच्या समर्थाकांशी सवांद साधणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची माहीती मिळताच शहरातील समर्थकांमधे चैतन्याचे वातावरण आहे.

मोहटादेवी गडाच्या परीसरात मुंडे समर्थक फलक लावुन त्यांचे स्वागताची तयारी करीत आहेत. मुंडे यांचाही परळीनंतर पाथर्डीकरावंर चांगलाच जीव आहे. मुंडे यांच्या येण्याने व त्यांच्या भुमिकेकडे डोळे लावुन बसलेले पाथर्डीकर त्यांच्या स्वागताची तयारी करीत आहेत. मुंडे समर्थकांची सध्या सोशल मिडीयातुन जोरदार बँटींग सुरु आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office