केंद्र सरकारने शेतकर्‍यांना देशोधडीस लावले याचे माजी मंत्री विखे यांनी आत्मचिंतन करावे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  महाविकास आघाडी सरकारने मागील सहा महिन्यात शेतकर्‍यांना कोणती मदत केल्याचे म्हणार्‍या नेत्याने केंद्र सरकारने कशा पध्दतीने भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेऊन शेतकरी विरोधी धोरण राबविले व कशा पध्दतीने शेतकर्‍यांना देशोधडीस लावण्याचे कार्य केले

याचे आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे सांगून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाना साधला आहे. कांद्याच्या निर्यातबंदी हटविण्याची मागणी जोर धरु लागत असताना, केंद्र सरकारला लक्ष करणार्‍या महाविकास आघाडी सरकारने मागील सहा महीन्यात शेतकर्‍यांना कोणती मदत केली?

असल्याचा सवाल माजी मंत्री विखे यांनी उपस्थित केला आहे. याला उत्तर देत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लहामगे यांनी स्वर्गीय पद्मश्री विठ्ठलराव विखे पटील व बाळासाहेब विखे पाटील तसेच विखे पाटील कुटुंबीयांची नाळ शेतकर्‍यांशी जोडली गेलेली आहे. दुध प्रश्‍नाप्रमाणे जसे महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन केले.

त्याप्रमाणे कांदा निर्यात बंदी उठविण्यासाठी विखे यांनी केंद्र सरकार विरोधात देखील आंदोलन करण्याची गरज होती. त्यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारशी या प्रश्‍नावर समन्वय साधला असता तर शेतकर्‍यांना त्यांच्याप्रती एक वेगळी आस्था निर्माण झाली असती.

मात्र शेतकरी विरोधी धोरणाला विरोध करणार्‍या महाविकास आघाडी सरकारलाच दोषी ठरविण्यात माजी मंत्री राधाकृष्ण विखे धन्यता मानत आहे. विरोधी पक्ष नेते असताना तुंम्ही देखील भाजप सरकार कशा पध्दतीने शेतकरी विरोधी धोरण राबवित असल्याचे वक्तव्य केले होते.

महाविकास महाआघाडीचे मंत्री व नेते झोपले नसून, मागील सहा महिन्याच्या काळात आघाडी सरकार कोरोनाशी सक्षमपणे लढा देत आहे. शेतकर्‍यांना देशोधडीस लावण्याचे पाप कधीच शिवसेना व महाविकास आघाडी सरकारच्या मनात देखील येणार नाही.

कारण हे सरकार सर्वसामान्य माणसाचे व शेतकर्‍यांचे आहे. केंद्र सरकार चुकीचे शेतकरी विरोधी धोरण राबवित असताना उलटे राज्य सरकारला दोष देणे चुकीचे आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून, अशा बेताल वक्तव्याने भाजपची प्रतिमा बदलू शकत नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24