अहमदनगर बातम्या

माजी आमदार कर्डिले राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :-  आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. मात्र कर्डिलेंची ही संभाव्य उमेदवारी राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, महानगर पालिका आणि नगर पालिका नगरसेवक मिळून ३९८ पैकी आजमितीला ३९६ पात्र मतदार आहेत.

विधान परिषदेसाठी राज्यात सत्तेत असणारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात सरळ लढत होणार आहे. राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप विद्यमान आमदार म्हणून कार्यरत आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार कर्डिले राष्ट्रवादीच्या संपर्कात असून राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी नाकारली, तर जगताप गट नाराज होऊ शकतो.

पण त्यांचे व्याही कर्डिलेंना राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी दिल्यास जगताप गट शांत होऊ शकतो, राज्यमंत्री तनपुरेंसमोरील अडथळा दूर होऊ शकतो आणि पारनेर,

श्रीगोंदे, राहुरी मतदारसंघात कर्डिले यांचा फायदा होण्याबरोबच भाजपला धक्का बसेल. विधान परिषद राष्ट्रवादीसाठी एकतर्फी होऊ शकते.

खासदार सुजय विखेंसमोरील अडचणीत वाढ होऊ शकते. त्यामुळे कर्डिले हे राष्ट्रवादीत जाऊन उमेदवारी करतील. त्याबदल्यात बाजार समितीवरील चौकशीचे विघ्न ही दूर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office