अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे, साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष, माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या मातोश्री, श्रीमती रत्नमाला मुरलीधर ससाणे यांचे दुपारी १२ : ३० वाजेच्या सुमारास, वृद्धापकाळाने
निधन झालय, निधना वेळी त्यांचे वय ८५ वर्ष होते, जयंतराव ससाणे यांच्या सामाजिक राजकीय वाटचालीत, स्वर्गीय रत्नमाला ससाणे यांचा मोलाचा वाटा होता, त्या सुनील ससाणे यांच्या मातोश्री व उपनगराध्यक्ष करण जयंत ससाणे, यांच्या आजी होत्या.
आपल्या मनमिळावू स्वभाव तसेच प्रत्येकाशी त्याचे वैयक्तिक संबंध होते, श्रीमती रत्नमाला मुरलीधर ससाणे यांच्या जाण्याने, तालुक्यात शोककळा पसरली असून,
त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर सुयोग मंगल कार्यालय याठिकाणी आले होते, सायंकाळी श्रीरामपूर येथील अमरधाम या ठिकाणी , श्रीमती रत्नमाला मुरलीधर ससाणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात १ मुलगा ,३ सुना, ४ नातवंड, असा मोठा परिवार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved