अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-कोरोना काळात आपण दिवाळीला शेतकऱ्यांना १२५ रुपये प्रतिटन ऊस उत्पादन प्रोत्साहन अनुदान दिले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्यामुळे अगस्तीला पैसे उपलब्ध झालेत.
अगस्ती सुरळीत व चांगला चालू असून विरोधकांनी त्याची काळजी नये. निवडणुकीसाठी अद्याप मतदार यादीच निश्चित नाही, तोच विरोधकांच्या जोर-बैठकाही सुरू झाल्या.
जनता माझ्याच बरोबर असूून अगस्ती सक्षमपणे चालू असून विरोधकांनी उठबस त्याची चिंता करू नये, अशी टीका अगस्तीचे अध्यक्ष मधुकर पिचड यांनी सेवानिवृत्त सनदी अधिकारी बी. जे. देशमुख यांचे नाव न घेता केली.
अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोतूळ उपबाजार आवारात बुधवारी पेट्रोल व डिझेल पंपाचे उद्घाटन पिचड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळेस शॉपिंग सेंटरचे भूमिपूजन व ५० टनी वजनकाट्याचेही (वेब्रीज) उद्घाटन झाले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पिचड बोलत होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved