अहमदनगर बातम्या

माजी आमदार राहुल जगताप करणार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश? देवगिरी बंगल्यावर घेतली अजित पवार यांची भेट

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही काही कारणाने वैशिष्ट्यपूर्ण आणि तितकीच चुरशीची देखील पाहायला मिळाली. या निवडणुकीमध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून माजी आमदार राहुल जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात होते व या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.

परंतु आता त्यानंतर मात्र त्यांनी राजकीय हालचालींना सुरुवात केली असून सोमवारी त्यांनी सकाळी दहा वाजता मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली असून लवकरच ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

शपथविधी आणि मंत्रिमंडळ झाल्यानंतर ते पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा असून या चर्चांना श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांच्या माध्यमातून देखील दुजोरा देण्यात आलेला आहे.

श्रीगोंद्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत कुणीही मोठा नेता नाही
जर सध्या आपण श्रीगोंद्याचा विचार केला तर या ठिकाणी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा न सोडल्यामुळे अनुराधा नागवडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता व महाविकास आघाडी कडून विधानसभा लढवली.

त्यामुळे या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कोणीच मोठा नेता नाही व मोठी पोकळी या निमित्ताने निर्माण झालेली आहे. तसेच या निवडणुकीत महायुतीने भरघोस बहुमत मिळवले असल्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता आल्यामुळे माजी आमदार राहुल जगताप यांच्या अजित पवारांच्या पक्षात प्रवेशाच्या हालचाली आता सुरू झाले आहेत.

राहुल जगताप यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेतली व यावेळी त्यांच्यात पक्षप्रवेश बाबत सविस्तर चर्चा झाली आहे. नव्याने आता मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे समजते.

राहुल जगताप यांचे जर श्रीगोंद्यातील राजकीय वर्चस्व पाहिले तर कुकडी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ तसेच श्रीगोंदे तालुका खादी ग्रामोद्योग संघासह अनेक ग्रामपंचायती व सेवा संस्था यांच्यावर राहुल जगताप यांच्या गटाचे वर्चस्व आहे.

इतकेच नाहीतर जगताप हे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तसेच रयतचे कौन्सिलिंग सदस्य देखील आहेत. विशेष म्हणजे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात असताना देखील त्यांनी श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची मते त्यांनी मिळवली.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी कुकडी सहकारी साखर कारखान्याला कर्ज मिळण्यासाठी अजित पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा होती व त्यामुळे जगताप यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil