जिल्हा सहकारी बँकेसाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले तिसऱ्यांदा रणांगणात !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- जिल्हा सहकारी बँकेसाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले तिसऱ्यांदा रणांगणात उतरत आहेत. २२ जानेवारी रोजी शक्ती प्रदर्शनात कर्डिले सेवा सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल करत आहेत.

तालुक्यातील १०९ मतदारांपैकी ८० पेक्षा जास्त मतदारांसह अर्ज दाखल करण्याची त्यांची तयारी सुरू असताना महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार शोध सुरू आहे.

जिल्हा सहकारी बँकेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. सेवा सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार शिवाजी कर्डिले तिसऱ्यांना रणांगणात उतरत आहेत.

यापूर्वी दोन वेळा कर्डिले विरोधात महाविकास आघाडीला उमेदवार देता न आल्याने कर्डिले बिनविरोध संचालक झाले. यावेळी ही कर्डिले यांनी जिल्हा बँकेची निवडणूक प्रथमपासून गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत होते.

जानेवारी २०२० मध्ये ज्यावेळी जिल्हा बँकेसाठी सेवा सोसायटी मतदारसंघातून मतदारांचे ठराव केले जात होते. त्याचवेळी आपले ठराव जास्त कसे होतील, याची रणनीति आखत त्यांनी यशस्वीपणे महाविकास आघाडीवर मात केली होती.

१०९ पैकी ८० पेक्षा जास्त ठराव कर्डिले समर्थकांचे असल्याचा दावा कर्डिले समर्थक करतात. महाविकास आघाडीही ४० ठराव आपले असल्याचे सांगत आहे.

दोन्ही बाजूंकडून दावे प्रतिदावे केले जात असले, तरी एका बाजूने कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली असताना महाविकास आघाडीचा उमेदवार शोध अद्याप सुरूच आहे.

महाविकास आघाडीचे नेते प्रा. शशिकांत गाडे यांनी जिल्हा बँकेची निवडणूक यावेळी बिनविरोध होणार नाही, असे जाहीर सांगितले. पण उमेदवार कोण याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही.

अहमदनगर लाईव्ह 24