जिल्हा बँकेसाठी माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी अर्ज दाखल केला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-जिल्हा सहकारी बँकेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी शुक्रवारी (दि.22) दुपारी अर्ज भरला.

सेवा सोसायटी मतदार संघातून माजी आमदार शिवाजी कर्डीले तिसऱ्यांदा रानांगणात उतरले आहेत. शुक्रवारी दुपारी आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला अर्ज दाखल केला.

याअगोदर दोन्ही वेळेस महाविकास आघाडीला आपला उमेदवार न देता आल्यामुळे मा. आ. कर्डीले बिनविरोध संचालक झाले.

आताही कर्डीले यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्यासाठी कंबर कसली आहे. 109 पैकी 80 पेक्षा जास्त ठराव कर्डीले समर्थकांचा असल्याचा दावा कर्डीले समर्थकांकडून केला जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24