अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- गेल्या आठ दिवसांपासून आढळा विभागातील देवठाण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले आहे. अकोला तालुक्यातील देवठाण, विरगाव, गणोरे, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, पिंपळगाव निपाणीसाठी हे धरण जीवनरेखा समजले जाते.
यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी धरणावर जाऊन जलपूजन केलं. अकोले तालुक्यातील आढळा विभागातील देवठाण धरण पूर्ण क्षमतेने भरले असून काल माजी आमदार वैभवराव पिचड व लाभ क्षेत्रातील ग्रामस्थ यांच्या हस्ते साडी, चोळी, श्रीफळ वाहून जलपूजन करण्यात आले.
तसेच वृक्षारोपणही करण्यात आले. `राज्य शासनाने आढळा परिसराला भविष्यात वरदान ठरणारा बिताका प्रकल्प पूर्ण करावा` अशी मागणी पिचड यांनी केली. यावेळी पिचड म्हणाले, आढळा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने लाभ क्षेत्रातील शेतकरी आनंदी झाला आहे.
धरण ओव्हरफ्लो झाले असल्याने दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात यावे, गावतळे तसेच छोटे बंधारे भरून घ्यावेत. यासाठी संबंधित कार्यकारी अभियंता जी. जी. नान्नोर, उपअभियंता गणेश हारदे व व्ही. एन. देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून पिचड यांनी संपर्क साधून तातडीने कालव्यांद्वारे पाणी सोडण्याच्या सूचना केल्या व त्यानंतर अधिकार्यांनी दुपारी कालव्यांना पाणी सोडले.
यावेळी अगस्ती साखर कारखाना संचालक रामनाथ बापू वाकचौरे, अमृत सागर दूध संघाचे व्हा चेअरमन रावसाहेब वाकचौरे, अगस्तिचे संचालक सुनील दातीर, माजी पं.स. सभापती अंजनाताई बोंबले, माजी पं.स.सदस्य अरुण शेळके, रामदास आंबरे, सुहास कर्डिले, अंकुश थोरात, संदीप उगले,
संतोष आंबरे, सुनील नाईकवाडी, दत्तात्रय आंबरे, संदीप उगले, बाळासाहेब शिंदे, संजय आंबरे, नवनाथ कुमकार, रमेश वाकचौरे, अनिल वाकचौरे, एकनाथ सहाणे, केशव बोडके, श्रीकांत सहाणे, सुभाष सहाणे, परसराम काकड, रामदास काळे, आनंदा गिर्हे, विष्णू कातोरे, सीताबाई पथवे आदी लाभ क्षेत्रातील ग्रामस्थ उपस्थित होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved