पारनेर : मला जिल्हा परिषदेत समिती मिळाल्याचे सर्व श्रेय माजी आ.औटी यांना आहे. या समितीत काम करताना अगदी थोडा कालावधी आहे, परंतु पारनेर तालुक्याला बांधकाम समितीची संधी पहिल्यांदाच मिळाली म्हणून लोकांच्या अपेक्षा निश्चितच जास्त आहे. त्या पूर्ण करताना मी कोठेही कमी पडणार नाही याची खात्री आहे.
असे मत जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते यांनी व्यक्त केले.तालुक्यातील कर्जुले हर्या येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी आ. विजया औटी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, कर्जुले हरेश्वर मधील सर्व कामे मार्गी लावणार असून परंतु सर्वप्रथम आंधळे येथील रस्ता मार्गी लावणार आहे. जिल्हा परिषद मार्फत असणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तुम्ही सांगितलेली सर्व कामे मार्गी लावले जातील, काळजी करू नका अशी ग्वाही सभापती दाते सर यांनी दिली.
निवडणुकीत हार-जीत होतच असते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून माजी. आ.औटी तालुक्याचे कोणताही प्रश्न मार्गी लावू शकतात.त्यासाठी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात करावी अशी अपेक्षा सभापती गणेश शेळके, मार्केट कमिटीचे संचालक अशोक कटारिया यांनीही मनोगत व्यक्त केले.