अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी सादर केलेले बजेट हे आपल्या देशाला पुढे नेऊन आत्मनिर्भर करणारे व सर्व क्षेत्राना दिलासा देणारे असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी व्यक्त केले.
बँकिंग, ईंड्रस्ट्रीज, उद्योजक व सर्वसामान्य नागरीकांसठी हे बजेट मोठे दिलासादायक आहे. विशेष करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार असल्याने मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. सर्व सामान्य नागरिकांना,
लघु उद्योजकांना सवलती देणारे हे बजेट असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार आपल्या देशाची वाटचाल आत्मनिर्भर भारत होण्याकडे करणारे हे बजेट आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार दिलीप गांधी यांनी दिली