वीजबिल माफीसाठी पंचायत समिती माजी सभापतीचे उपोषण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-कोरोनाची महामारी आणि त्या नंतर झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.

त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असुन तो पुर्णपणे हवालदिल असतानाच महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे शेतीचे विजपंपाचे बिल आकारणी चालुकरत थकीत शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करत असल्याने

अधिच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून बिल आकारणी तात्काळ थांबविण्यात यावे या मागणीसाठी श्रीगोंदे तहसील कार्यालयासमोर

पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांनी आज शेतकऱ्यांसोबत उपोषण सुरू केले असून या उपोषणाला तालुक्यातील म.न.से सह सर्व पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24