अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त, काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार अशोक भिमाशंकर खांबेकर (वय ६५ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले.
खांबेकर यांना गेल्या काही दिवसापुर्वी कोरोनाची लागण झाल्याने नाशिक येथील अशोका रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरू असताना त्यांची अचानक प्रकृती खालावली आणि शुक्रवार दि. २५ डिसेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान स्व.अशोक खांबेकर यांचे वडील भीमाशंकर खांबेकर हे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे व काँग्रेसचे खंदे समर्थक व शिर्डी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते. अशोक खांबेकर हे ही अखेरपर्यंत काँग्रेसचे समर्थक होते.
साई संस्थानमध्ये त्यांची व माजी विश्वस्त डॉ. एकनाथराव गोंदकर यांची कारकीर्द संस्थानच्या हिताची ठरली होती. त्यांनी अनेक संस्थान अहिताचे निर्णय समितीला फिरवायला लावले होते.