अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : मुंबईहून केसापूर येथे आलेले पती, पत्नी व मुलाला, तर वांबोरीत इंजिनिअरला कोरोना संसर्ग झाल्याचे तपासणी अंती उघड झाले. एकाच दिवशी चार पाॅझिटिव्ह रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली.
केसापूर येथील कुटुंब हरेगाव येथे चाललो आहोत, असे सांगून वांग्याच्या टेपोने ठाणे येथे नातलगाच्या विवाहासाठी गेले होते. ते शनिवारी गावात आले. त्यांनी घरात मुलाचा वाढदिवस साजरा केला.
सोमवारी मुलगा आजारी पडल्यावर बेलापूर येथे खासगी रुग्णालयात नेले. डाॅक्टराना शंका आल्याने त्यानी १०८ रूग्णवाईकेतून त्यांना नगर येथे शासकीय रुग्णालयात पाठवले.
तेथे वडील (४४), आई (४०) व मुलगा (१५) पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. केसापूरमधील संबंधित परिसर सील करण्यात आला आहे. गावातील दुकाने बंद करण्यात आली असून गावात वैद्यकीय पथक आले आहे.
संपर्कातील व्यक्तींचा शोध वैद्यकीय यंत्रणा घेत आहे. चौथा रुग्ण वांबोरी येथील मूळ रहिवासी सध्या पनवेल येथील कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता.
सोमवारी येत असताना त्याला त्रास जाणवू लागला. नगर येथील खासगी रुग्णालयात तो दाखल झाला. शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली असता कोरोना संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews