चार दिवसांपूर्वी पोत्यात अन् आता कपड्यात गुंडाळून चिमुकलीला कचऱ्यात फेकले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : चार दिवसांपूर्वीच परळी शहरात मालेवाडी रस्त्यावर एका नकोशीला पोत्यात गुंडाळून फेकण्यात आले होते. तिच्यावर उपचार चालू असतानाच काल नंदागौळ रोडवरील नगर पालिकेच्या कचरा डेपोजवळ नवजात पाच दिवसाच्या बालिकेला फेकून देण्यात आल्याची

घटना उघडकीस आली आहे. लाल रंगाच्या कपड्यात पाच दिवसांपूर्वी जन्मलेले नवजात मुलगी फेकून दिल्या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात पोलिसांच्याच फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

काही वर्षांपूर्वी देशभरात स्त्रीभ्रूणहत्या व गर्भलिंग निदान प्रकरणात बदनाम झालेले परळी शहर आता लागोपाठ दोन -चार दिवसाच्या फरकात दोन नकोशा मुली रस्त्यावर फेकून दिलेल्या आढळून आल्यामुळे आता सर्वत्र चर्चेत आले आहे.

गुरुवारी ११ तारखेस परळी नंदागौळ रस्त्यावरील नगर पालिकेच्या कचरा डेपो जवळ लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळलेले पाच दिवसाची नवजात शिशु आढळून आले आहे. दर नवजात बाळास उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

परळी शहरातील नंदागौळ रस्त्यावर नगरपालिकेचा कचरा डेपो असून या कचरा डेपोच्या कोपऱ्यावर लाल रंगाच्या कपड्यांमध्ये स्त्री जातीचे नवजात बाळ टाकून दिलेल्या अवस्थेत होते. या रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीस ते आढळून आले.

त्याने ही बाब परळी पोलिसांना कळवली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.