अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- संक्रांतीच्या काळात बंदी असतानाही नायलॉन मांजा सर्रास वापरला जात आहे. याच्या वापरामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.
दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पक्षी मृत्युमुखी पडत आहेत, याची दखल घेऊन नगरच्या वन विभागाने चार भरारी पथके तयार केली आहेत.
या मांजाची विक्री व वापर करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांनी सांगितले आहे.
नॉयलॉन मांजाची कुठे विक्री होत असल्यास नागरिकांनी ९८५०७५१८९९ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील. जी मुले हा मांजा वापरताना आढळतील त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात येईल, याची पालकांनी नोंद घ्यावी, असेही वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.