अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-पुणे रोडवरील नालेगाव शिवारात खोदकाम सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणाहून चार लाख रुपये किंमतीचे खोदकाम मशीन अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.
याप्रकरणी सादीक शहाबुद्दीन शेख (वय 42 रा. नांदगाव ता. नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सादिक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नगर-पुणे रोडवरील नालेगाव शिवारात काम सुरू असलेल्या ठिकाणाहून माझे खोदकाम मशीन व त्यातील कागदपत्रे अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.
पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहेत.