अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे चार बछडे सापडले !

Published by
Ahmednagarlive24 Office

ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे चार बछडे आढळल्याचे तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा हद्दीतील राहुरी एमआयडीसी परिसरात काल बुधवारी उघडकीस आले. चार नवजात बछडे असल्याने आसपास मादी बिबट्याचा संचार असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या आठवड्यात जोगेश्वरी आखाडा येथील शेतकरी सचिन हारदे यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याची बछडे दिसून आले होते. मात्र त्यावेळी उसतोडणी थांबविण्यात आली.

काल बुधवारी सकाळी विठ्ठल भाऊराव शेटे यांच्या सर्वे नंबर २६४ मध्ये ऊसतोड कामगार तोडणी करत असताना बिबट्याचे ४ बछडे कामगारांना दिसली. त्यांनी विठ्ठल शेटे यांना ही माहिती दिली.

त्यानंतर त्यांनी वनविभागास कळविले असता वनविभागाचे वामन लांबे, ताराचंद गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन ४ बछडे ताब्यात घेतले आहेत. दरम्यान ४ बछडे असल्याने या ठिकाणी मादीचा वावर असून शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे.

वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी मारुती हारदे, गणपत हारदे, अजय शेटे, नंदकुमार चोथे, भारत करजूले, भगवान म्हसे, गणपत भुजाडी, प्रमोद शेटे, बाबासाहेब गाडे, गणेश गायगाये आदीसह शेतकऱ्यांनी केली आहे.

उसाचे शेत हे बिबट्याचे प्रमुख निवासस्थान झाले असून गेल्या काही दिवसात ऊस तोडणी करताना बिबट्याचे बछडे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ऊस तोड कामगार मजुरांनी ऊस तोडणी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office