अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून एकाच कुटुंबातील चौघांना फायटर व बांबूने बेदम मारहाण केली.
ही घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजता तालुक्यातील निमज येथे घडली. या संदर्भात १४ जणांवर संगमनेर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोपट कासार मुलीला घेऊन घरी जात असताना १४ जणांच्या जमावाने त्यांना अडवून भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून वाद घातला.
त्यांना जमावाने जबर मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी, आई व मुलीलाही मारहाण करण्यात आली. पोपट कासार गंभीर जखमी झाले.
त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांनी बुधवारी दिलेल्या फिर्यादीवरून गुलशन भरत कातोरे, कुसूम गुलशन कातोरे, विलास बच्छाव कासार, शकुंतला बच्छाव कासार,
मीना विलास कासार, बच्छाव बाबुराव कासार (निमज), बाळू उत्तम दिघे यांचा मुलगा (नाव माहीत नाही, कोल्हेवाडी) व अन्य ७ आदी १४ जणांवर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार करत आहे.