भाजीपाला व्यावसायिक लूटमार प्रकरणी टिंग्या टोळीच्या चौघांना ताब्यात घेतले

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  नगर शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यातच नगर शहरातील एका भाजीपाला विक्रेत्यावर हल्ला करून सोन्याची चैन चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी चार संशयीतांना या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे.

याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान ही लुटमार टिंग्या टोळीने केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी टिंग्या व त्याच्या साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Advertisement

अधिक माहिती अशी कि, सदर टिंग्या टोळी कोतवाली व तोफखाना हद्दीत लुटमार करण्याचे काम करते. या टोळीवर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत.

सोमवारी नगर शहरातील जुन्या कोर्ट परिसरात भाजीपाला विक्रेते सतिष ऊर्फ बाळासाहेब नारायण नरोटे (रा. चितळेरोड, अहमदनगर) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी धारदार हत्याराने हल्ला केला होता.

त्यांच्याकडील अडीच लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन चोरून नेली होती. ही घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी 4 संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करण्याचे काम सुरू होते.

Advertisement