अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
शहरातील वार्ड नंबर 2 मध्ये काही रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून संपर्कातील लोकांची तसेच इतर नागरिकांची तपासणी (टेस्ट) केली जात आहे.
या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये काल घेण्यात आलेल्या ‘रेपीड टेस्ट’मध्ये चार जणांना कोरोनाची बाधा आढळून आली. त्यांना येथील सेंट लुक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आतापर्यंत तब्बल 90 अहवालाची प्रतिक्षा आहे. प्रशासनाकडून गुरुवारी 58, शुक्रवारी 16 तर शनिवारी 60 लोकांची तपासणी करण्यात आली.
कालची टेस्ट ही रेपीड टेस्ट होती. त्यामध्ये 60 पैकी 56 जण निगेटिव्ह आले तर चार जण बाधित आढळले. यामध्ये एक पुरुष, दोन मुले व एक मुलगी आहे. या सर्वांना सेंट लुक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नवीन चार रुग्ण आढळल्याने या भागामध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, अंतर राखावे, वयस्कर नागरिक व मुलांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन या भागातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews