Ahmednagar News : सध्या अनेकजण काही काम न करता श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र प्रत्यक्षात ते शक्य नसल्याने आता काहीतरी करून पैसे कमवायचे असा निश्चय करतात मात्र असे अनेक तरुण चुकीच्या मार्गाकडे वळतात असे समोर आले आहे .
नुकतीच नगरमध्ये दोघांनी मौजमजा व मैत्रणीला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी एका प्रवाशाला लुटल्याची घटना समोर आली आहे. दररम्यान अशीच रेल्वेचे मौल्यवान धातूच्या साहित्याची चोरी करणाऱ्या चौघांच्या टोळीला नगरच्या रेल्वे पोलिसांनी शहरात अटक केली आहे .
महेश सुधाकर भापकर (वय २५, काळे वस्ती, पाथर्डी), राहुल पांडुरंग दंडवते (वय २५, रा. शेवाळे गल्ली, पाथर्डी), गोरक्ष राजेंद्र केकाण (वय २९, रा. निवडुंगे, ता. पाथर्डी), बाळासाहेब तुकाराम गर्जे (वय ४५ रा. कापशी ता. आष्टी, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरी केलेली सव्वा दोनशे किलो तांब्याची तार व चार चाकी वाहन जप्त करण्यात आले.
रविवारी रेल्वे पोलिस व पाथडी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. महेश भापकर यांच्या घरातून मुद्देमाल व या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. नगर-परळी रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे.
या कामावर असलेली तांब्याची तार आरोपींनी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हद्दीतून चोरली होती. यापूर्वी देखील काही दिवसांपूर्वी नगर-परळी रेल्वेमार्गावरील नगर तालुक्यातील नारायणडोह गावाच्या हद्दीतून तांब्याच्या तारेची चोरी करण्यात अली होती. याच काळात अशी चोरी करताना विजेचा जबर धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू देखील झाला होता.
याबाबत रेल्वे पोलिसांकडे काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध रेल्वे पोलिसांना लागला होता. पाथर्डी पोलिसांची मदत घेऊन या आरोपींना रविवारी अटक करण्यात आली.
या नव्या तांब्याच्या तारची किंमत प्रतिकिलो एक हजार रुपये रुपये असून अंदाजे दोन ते सव्वा दोन लाख रुपयांची तार पकडण्यात आली.