अहमदनगर बातम्या

दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत चौघेजण जखमी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- कर्जत- नगर महामार्गावर सोमवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास दुचाकींचा अपघात झाला. दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत चौघे जण जखमी झाले आहेत.

अपघात स्थळाजवळ उभा असलेला एक व्यक्तीही यात जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मे. साई एच.पी. गॅस ऑफिससमोर हा अपघात झाला.

या अपघातात दत्तात्रय सुपेकर व त्यांची ११ वर्षांची मुलगी वैष्णवी सुपेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात सुपेकर यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

दुसऱ्या केटीएम या स्पोर्ट्स दुचाकीवरील अमन तय्यब पठाण, अब्रार कासम पठाण रा. पोस्टऑफिसजवळ, कर्जत हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office