चाकूच्या धाक दाखवत रोखपाल तरूणीवर अत्याचार त्या अवस्थेतील फोटेा व्हायरल करण्याची धमकी देत साडेचौदा लाख लुटले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-पाथर्डी शहरातील एका मल्टीस्टेटच्या रोखपाल असलेल्या युवतीच्या गळ्याला चाकू लावुन तिच्यावर अत्याचार केला.

युवतीचे त्या अवस्थेतील फोटो व व्हीडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देवून संस्थेच्या तिजोरीमधील ग्राहकांचे पाच लाख तिन हजार चारशे रुपये रोख व तारण ठेवलेले अकरा लाख पासष्ट हजार रुपयाचे सोन्याचे दागिने पीडित युवतीकडुन बळजबरीने खंडणी स्वरुपात घेतल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी सागर संजय देशपांडे, रा. वामनभाऊ नगर, पाथर्डी (मुळ रा. पैठण, जि.औरंगाबाद) याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी-नगर रस्त्यावरील एका मल्टीस्टेटमध्ये सागर देशपांडे हा व्यवस्थापक पदावर काम करीत होता.

संस्थेने त्याला कामावरुन काढुन टाकले होते. त्याच संस्थेत रोखपाल म्हणुन काम करणाऱ्या युवतीशी त्याची ओळख होती. सागरने त्या युवतीला १६ आँगस्ट २०२० रोजी वामनभाऊ नगर येथील राहत्या घरी बोलावले. तेथे तिच्या गळ्याला चाकु लावला तिचे त्या अवस्थेतील फोटो काढून व्हिडीओ चित्रीकरण करत अत्याचार केला.

त्यानंतर तीला धमकी देवुन ब्लँकमेल केले. तिच्याकडुन संस्थेच्या तिजोरीतील पाच लाख तिन हजार चारशे रुपये रोख घेवुन गेला. तसेच संस्थेत ग्राहकांनी ठेवलेले अकरा लाख पासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिनेही बळजबरीने नेले. दि.१३ डिसेंबर रोजी सागरने त्या युवतीला फोन करुन एका हॉटेलवर बोलावुन घेतले.

तेथे त्याच्या मोबाईल मधील युवतीला तिचे फोटो व व्हीडीओ चित्रीकरण दाखवुन तू मला पैसे व दागिने मागीतले तर हे व्हायरल करील करील अशी धमकी देवुन हाकलुन दिले. युवतीने दिलेल्या तक्रारीवरुन सागर देशपांडे याच्याविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24