अहमदनगर बातम्या

वाहन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  रुग्णवाहिका घेण्यासाठी पूर्ण रक्कम देऊनही वाहन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या घुलेवाडी येथील अश्व मोटर्सचा व्यवस्थापक संतोष भाऊसाहेब काचोळे (कासारवाडी) याच्यावर शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.(Fraud news)

तालुक्यातील साकुर येथील मुळा खोरे पतसंस्थेने नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका घेण्याचा ठराव ग्रामपंचायतमध्ये केला होता.

पतसंस्थेचे व्यवस्थापक संतोष पंधारे यांनी अश्व मोटर्सचा व्यवस्थापक काचोळे यांना संपर्क साधून ७ लाख २६ हजार रुपये किमतीच्या रुग्णवाहिका घेण्याचे ठरवले.

मागील वर्षी रुग्णवाहिकेचा रकमेपोटी पंधारे यांनी वेळोवेळी अश्व मोटर्सच्या खात्यात पूर्ण रक्कम वर्ग केली. रुग्णवाहिकेची चौकशी केली असता काचोळे यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पंधारे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली.

यावरुन काचोळेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी तपासाला गती दिली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office