Ahmednagar News : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत क्लर्क पदाची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून संगमनेर तालुक्यातील चार जणांची २२ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की कीर्ती सतिषकुमार भालेराव (रा. कामराजनगर, घाटकोपर, मुंबई), शिवदर्शन नेताजी चव्हाण व विश्वजित विकास चव्हाण (दोघे रा. चिंचवड, पुणे) यांनी नोकरीचे आमिष दाखवून संगमनेर तालुक्यातील युवकांना फसविले आहे.
या आरोपींनी युवकांना विश्वासात घेऊन पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत क्लर्क या पदावर नोकरी लावुन देतो, असे आमिष दाखविले. नोकरी लावून देण्यासाठी त्यांनी प्राची रमेश काकड हिच्याकडून ५ लाख ४० हजार, ज्योती संजय मालदाड रोड, संगमनेर यांचे ५ लाख ४० हजार, शिवाणी प्रतिक पवार (रा. मंगळापूर. ता. संगमनेर ) ५ लाख ४० हजार, सुनिल यशवंत हांडे (रा. इंदिरानगर, संगमनेर) ९० हजार रुपये असे एकुण २२ लाख १० हजार रुपये घेतले.
याबाबत प्राची रमेश काकड हिने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी कीर्ती सतिषकुमार भालेराव, शिवदर्शन विश्वजीत चव्हाण चव्हाण, विश्वजीत यांच्याविरुद्ध गु.र.नं. ७८८ / २०२३ दुसार भा. दं.वि. कलम ४२०, ४६५, ४७३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.